दर्शनशास्त्र

दर्शन, दर्शनशास्त्र, आस्तिक दर्शन.

विषय – जैमिनी दर्शन

दर्शन – Philosophy
त्रिकालाबाधित सत्य / परमसत्य , नैसर्गिक नियमांचे उदाहरणासहीत केलेले विवेचन तसेच सत्य व असत्य यातील फरक ओळखण्याचा दृष्टीकोन म्हणजेच दर्शन. मानवी जीवनातील सर्वप्रकारच्या प्रश्नांचे योग्य उत्तर शोधण्यासाठी (मूलतत्व असलेल्या) दर्शनाचा उपयोग होतो. दर्शनाचा उपयोग हा प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीकौशल्यावर अवलंबून आहे. (दर्शन म्हणजे सत्य व असत्य यातील फरक ओळखण्याचा दृष्टीकोन)

दर्शनशास्त्र : दर्शनशास्त्र हे विद्वानांच्या दार्शनिक अनुभवांवरून निर्माण झाले आहे. यामध्ये दोन मुख्य विभाग आहेत. आस्तिक (वैदिक) दर्शन आणि नास्तिक (अवैदिक) दर्शन. तसेच भारतीय दर्शन व पाश्चिमात्य दर्शन हे प्रकार प्रत्येकी आस्तिक व नास्तिक विभागात येतात.

सत्य व असत्य यातील अस्पष्ट असलेला फरक चर्चेद्वारे स्पष्ट होणे, त्याची विविध पातळीवर चिकित्सा/मीमांसा झाल्यास त्याला योग्य व समाधानकारक उत्तर मिळणे (Conclusion) आणि त्याला वैदिक व अवैदिक विद्वानांद्वारे मान्यता मिळणे आवश्यक आहे.

चर्चेमध्ये चिकित्सा/मीमांसा खालील पाच विषयांच्या आधारावर होत असते.

१. ज्ञानमीमांसा (Epistemology)
२. तत्वमीमांसा (Metaphysics)
३. नितीमीमांसा (Ethics)
४. सौंदर्यशास्त्र (Aesthetics)
५. तर्कशास्त्र (Logic)

भारतीय दर्शन : भारतीय दर्शनशास्त्र हे वेद्केंद्रित असल्याने ह्यामाधेय वैदिक दर्शन व अवैदिक दर्शन असे दोन मुख्य विभाग आहेत. (पाश्चिमात्य दर्शन हे ईश्वरकेंद्रित आहे). ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ह्या चार वेदांना प्रमाण मानणारे वैदिक पंडित आहेत, याउलट वेदांना प्रमाण न मानणारे अवैदिक पंडित आहेत. कालांतराने वैदिक व अवैदिक पंडितांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्या. त्यातून आस्तिक दर्शनात सहा दर्शनांना मान्यता मिळाली, ज्याला षड-दर्शन असे म्हणतात. आणि नास्तिक दर्शनात चार्वाक, जैन, बौद्ध ह्या तीन दर्शनांना मान्यता मिळाली. (मागील काही शतकांमध्ये दर्शनशास्त्रात पाश्चिमात्य दर्शन व काही भारतीय दर्शनाचा समावेश झाला आहे. परंतु येथे आस्तिक दर्शनाची षड-दर्शने आणि नास्तिक दर्शनातील तीन दर्शने याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.)

षड-दर्शन (आस्तिक)

१. जैमिनी दर्शन : पूर्व मीमांसा.
२. वेदांत दर्शन : उत्तर मीमांसा (ब्रह्यसूत्र).
३. सांख्य दर्शन : महर्षी कपिल.
४. योग दर्शन : महर्षी पतंजली.
५. न्याय दर्शन : महर्षी गौतम.
६. वैशेषिक दर्शन : महर्षी कणाद.

(१) पूर्व मीमांसा : जैमिनी दर्शन

जैमिनी दर्शन अर्थात पूर्व मीमांसा मध्ये मुख्य सोळा अध्याय आहेत त्यापैकी बारा अध्याय क्रमबद्ध आहेत, ह्यात ६४ पदे आहेत. (आणि ह्यामध्ये १२४२ श्लोक असल्यामुळे येथे संक्षिप्त रुपात सुद्धा लिहिणे शक्य नाही, ईच्छुकांनी दर्शनशास्त्राच्या मूळ ग्रंथातून जैमिनी दर्शन वाचावे.) महर्षी जैमिनी सांगतात कि मीमांसा/जिज्ञासा हि व्यक्तीच्या ईच्छेचे प्रतिक आहे. (म्हणजे सत्य माहित करून घेण्याची ईच्छा). मानवी ईच्छा/जिज्ञासेचा उगम, त्याची कारणे, निर्माण होणारे प्रश्न, मानवी बुद्धीला सत्य शोधताना येणाऱ्या अडचणी, आणि अंतिमतः ज्ञानाचे दर्शन. सत्य/ज्ञानाचे दर्शन पुढील सहा प्रकारच्या साधनांद्वारे करता येऊ शकते १. प्रत्यक्ष, २. अनुमान, ३. उपमान, ४. शब्द, ५. अर्थ/अर्थापत्ति, ६. अनुपलब्धी/अभाव.

(पाणिनी च्या संदर्भानुसार मीमांसा म्हणजे जिज्ञासा).

*(१). प्रत्यक्ष – प्रत्यक्ष प्रमाणाव्यतिरिक्त ईतर पाच प्रमाण परोक्ष आहेत. म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या डोळ्यांनी व इंद्रियांनी अनुभवलेल्या “प्रत्यक्ष” प्रमाणाला सत्य म्हणता येते. परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही कि जे अनुभवले तेच पूर्ण सत्य आहे. म्हणून ईतर पाच साधने पूर्व मीमांसेत समविष्ट आहेत.

*(२). अनुमान – ह्या साधनात लिखित प्रमेय, चर्चा, चिंतन, मनन, ह्याद्वारे ज्ञान प्राप्ती साठी होणारे यत्न हे अनुमान ह्या साधनात समाविष्ट आहेत.

*(३). उपमान – तुलनात्मक पद्धतीने समस्या समजावून घेणे/सांगणे किंवा त्याचे समाधान शोधण्याचे हे साधन आहे. उदाहरणार्थ: आपल्याला पडलेला प्रश्न तुलनात्मक पद्धतीने सोप्या भाषेत मांडणे किंवा त्या प्रश्नाचे मिळालेले उत्तर तुलनात्मक पद्धतीने समजावून सांगणे ह्याला उपमान साधन असे म्हणतात.

*(४). शब्द – शब्दांच्या साधनांद्वारे समस्या किंवा समस्येचे समाधान लिखित स्वरूपात मांडणे, शब्दांना प्रमाण मानून त्याद्वारे ज्ञानाची अनुभूती घेणे हे ह्या साधानात समाविष्ट होते. (वेद किंवा वेदानुकुल साहित्यांच्या शब्द प्रमाण्याला नास्तिक प्रमाण मानत नाहीत.)

*(५). अर्थ / अर्थापत्ती – पंचेद्रीयांद्वारे परिस्थितीचे आकलन करणे आणि त्यातून दोन शक्यतांपैकी कोणती शक्यता खरी आहे. ह्याचा निर्णय घेणे किंवा दोन्ही शक्यतांचा समसमान विचार करणे. हे अर्थापत्ती साधनामध्ये समाविष्ट आहे.

*(६). अनुपलब्धी – अनुपलब्धी हे साधन अर्थापत्तीच्या उलट आहे. म्हणजे दोन शक्यतांपैकी कोणती शक्यता चुकीची/अयोग्य/अनुपलब्ध/अशक्य आहे. ह्याचा निर्णय घेणे.

वर नमूद केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त कर्मवादासंबंधी अजून बरेच मुद्दे जैमिनी दर्शनात आहेत. त्याबद्दल थोडक्यात लिहिता येणार नाही. जैमिनी दर्शनचा सूक्ष्म परिचय करून देण्यापुरते काही महत्त्वाचे मुद्दे येथे सोप्या भाषेत मांडले आहेत.

उद्या भारतीय षड-दर्शनातील दुसरे दर्शन “उत्तर मीमांसा : वेदांत दर्शन” विषयी माहिती घेऊ.

|| शिवोहम ||

माहिती संकलन आणि लेखन
सत्यम अवधूतवार

Advertisements

पाचट : प्रवास वर्णन

          ऊसतोड कामगारांचा विषय बऱ्याच दिवसांपासुन डोक्यात घोळत होता, काही दिवसांची सुट्टी काढुन मी पुण्याहुन संगमनेरला निघालो. सायंकाळी ७ वाजता शिवाजीनगरच्या बसस्थानकावर पोहचलो आणि तेथुन ऑटोरिक्षाने इशानच्या घरी. सालाबाद प्रमाणे इशानच्या जन्मदिनाचा कार्यक्रम पार पडला. रात्रीचा मुक्काम झाला. सकाळी सर्वेशच्या घरी न्याहारी करुन, सर्वांच्या भेटी गाठी उरकुन पाथर्डीकडे निघायला बराच वेळ लागला. दूपारी १:०० वाजता संगमनेरच्या बसस्थानकावर पोहचलो, महामंडळाचे लाल डब्बे भारतीय वेळेप्रमाणे धावत होते, अश्यात पाथर्डीची थेट गाडी मिळणे अशक्य. तेवढ्यात बसस्थानकापुढे काळी-पिवळी ऊभी करुन एक ड्रायवर श्रीरामपूर पर्यंत कमी वेळेत पोहचवण्याची ग्यारंटी देत होता. बाकी जास्त विचार न करता स्वारी काळी-पिवळीने श्रीरामपूर पर्यंत पोहचली, पुढे लाल डब्ब्याने मजल-दरमजल करीत सायंकाळी ६:०० वाजता स्वारी पाथर्डीत उतरली. तेथे तेजस भेटला, त्याने श्री. कौतुक चिंतामणी यांच्या दुकानापर्यंत सोडले. कौतुकजी बैठकीच्या निमीत्ताने बाहेर गेले होते, थोड्यावेळाने ते आले आणि आम्ही लगोलग दूचाकीवरुन वस्तीकडे निघालो. तेथे पोहचता पोहचता सूर्यास्त झाला आणि आम्ही वस्तीत ऊगवलो. कौतुकजींनी “अर्जुन भाऊराव आघाव” यांच्या घरी नेले, वस्तीमध्ये त्यांना सगळे तात्या म्हणतात. त्यांनी मला तात्यासमोर बसवले आणि माझा लघुपटाचा विषय समजावुन सांगितला. त्यांच्या तोंडुन पहिले वाक्य आलं की “ईतक्या वरसात कोण ईचारायला बी न्हाई आलं, पण आपल्या घरी आज देवाचा माणुस आला”, त्यांच्या ह्या वाक्याने मला फार वाईट वाटत होतं, पण जेंव्हा त्यांच्याशी माझी नजरानजर झाली तेंव्हा त्यांच्या डोळ्यातला आनंदभाव पाहुन मी थोडा सुखावलो. त्यांनी स्वतःचा अनुभव सांगायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आले की प्रवासातील महत्वाचे मुद्दे व अनुभव लिहुन घेण्यासाठी मी वही आणायची विसरलो (असणार तरी कशी? कपडे अन कॅमेरा बॅगेत कोंबुन मी शिवाजीनगरच्या बसस्थानकावर प्रकटलो होतो). सायंकाळची वेळ असल्यामुळे कॅमेरावर रेकॉर्डींग सुद्धा शक्य नव्हती, तेंव्हा त्यांच्या नातीने वहीचे दोन पानं फाडुन दिले. तोपर्यंत मी CFL च्या प्रकाशात उजळुन निघालेल्या त्यांच्या घरावर एक नजर फिरवली आणि वहीची पानं हातात येताच, त्या दोन-तीन पानांवर त्यांचं जीवन शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो.

          अर्जुन भाऊराव आघाव. वयोवर्ष ९० पूर्ण. आवाज खणखणीत. बत्तीस दात शाबुत. रोज तीन भाकरींच जेवन. गळ्यात तुळशीची माळ. कपाळावर चंदन बुक्क्याचा वारकरी टिळा. डोक्यावर गुलाबी पटका, अंगावर बंडी अन् धोतर. खांद्यावर शाल/उपरणं असा पेहराव. अजुनही चश्मा लागला नाही. रापलेल्या कातडीचा सुरकुत्या पडलेला तो थरथरनारा चेहरा आणि Finger Prints नसलेला घट्टं पडलेला हात, निःशब्दपणे त्या माणसाचा अनुभव मला सांगत होता. कान्हेगावचा महाराष्ट्र साखरकारखाना आणि भेंडा येथिल साखर कारखाना, ऊस तोडणाऱ्यांना दोन/अडिच रुपया प्रती टण, प्रती मजुर किंवा चार माणसांच्या कुटुंबासाठी (मुकादमाच्या दृष्टीने टोळी साठी) दहा रुपये भत्ता द्यायचे. त्याकाळी म्हणजे ८० च्या दशकात कारखाण्याचे कर्मचारी ऊसाची मोळी तपासायला यायचे, ऊस हा मुळापासुन काढून, धसकटं छाटून, पाचट सोलुन चांगली मोळी बांधलेला असेल आणि वजनाला एक क्विंटल जर भरत असेल तरच कर्मचारी मुकादमाकडं Clean Chit आणि Payment Receipt द्यायचे. जर यात थोडंसुद्धा कमी जास्त वाटलं तर ते कर्मचारी कसलाही विचार न करता ती मोळी सोडुन ऊस फेकुन द्यायचे आणि कर्मचारी गेल्यानंतर मुकादम त्याच ऊसानं सगळ्यांना झोडपायचा (पण सगळेच मुकादम एवढे क्रुर नसतात). त्या सोडलेल्या ऊसाच्या मोळीत जे काही बाकी राहीलं असेल छाटुन/घासुन/साफ करुन परत मोळी बांधुन दुसऱ्या दिवशी सकाळी मुकादमासमोर दाखवावी लागायची. एकदा का तो त्याच्या शेताजवळच्या छोटेखानी केबिनमध्ये जाउन बसला की सगळ्यांचा जीव भांड्यात पडायचा आन सगळेजण भराभर ऊस तोडायला सुरु करायचे. अलिखीत नियमानुसार साफ मोळ्या मुकादमासमोर वजन करुन झाल्या की डोक्यावर सूर्य यायच्या आत गाडी भरायची आणि सूर्यास्त व्हायच्या आत गाडी कारखाण्याला पोचवायची. हा ठरलेला दिनक्रम.

          तात्यांनी साखर कारखाण्यासाठी ऊस तोडणी ८० च्या सालापासुन सुरु केली, ह्या आधी ते गुळ बनविणाऱ्या भट्टीकडे ऊस पाठवत असत पण त्या ठिकाणी त्यांना मोबदल्यात फक्त धान्यच मिळायचे तसेच पाडव्याला आणि दिवाळीला सालगड्यासोबत धोतर-कुर्ता. तात्यांनी दररोज कमीतकमी पाच क्विंटल ते एक टण अशी ८० ते ८२ वर्ष ऊस तोडणी केली आहे. (आताच्या एक दोन वर्षात हात थरथरत असल्याने ते ऊस तोडायला जात नाहीत). तात्यांचा अनुभव मी मन एकाग्र करुन ऐकत होतो, कौतुकजींनी इतर काही लोकांचे अनुभव सांगितले. दोन तास आमची चर्चा चालु होती. सरतेशेवटी तात्यांच्या घरी पिठलं-भाकरी आणि ठेचा असा पाहुनचार घेऊन आम्ही सर्वांचा निरोप घेतला. तासाभरात आम्ही पाथर्डी गावात पोहचलो. तेथे रात्रीचा मुक्काम केला. सकाळी नाश्ता उरकला, कौतुकजी परत कुठेतरी बैठकीसाठी गेलेले असल्यामुळे त्यांची भेट नाही झाली, नंतर त्यांना फोन लावुन कळवलं आणि सर्वांचा निरोप घेऊन मी पाथर्डीच्या बसस्थानकाला पोहचलो. (भारतीय वेळेनुसार) १०:३० ची बस १:०० पर्यंत सेवेत रुजु होईल, हे चौकशी कक्षातल्या हापीसर महाशयांनी गायछाप चघळत चघळत दबक्या आवाजात सांगीतले. पाथर्डीत बस ऐवजी पावसाची ये-जा जास्त होती, तरीही दूपारी १२:०० पर्यंत वाट पाहून नाईलाजाने गेवराईची गाडी पकडुन पाडळशिंगी पर्यंत पोहचलो, रिमझीम बरससणाऱ्या पावसात चहाचा मोह न होणे अनैसर्गिक म्हणावे लागेल. तेथुन पुढे पुन्हा काळी-पिवळीत बसुन पावसाशी संघर्ष करीत करीत स्वारी बीडच्या संघर्षभूमीत पोहचली.

          बीडमध्ये पोहचताच गोवर्धन दराडे सरांच्या “ज्ञानदीप गुरुकुल” येथे भेट दिली. येथील भगवान विद्यालयात शिकणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी व इतर “भटक्या विमुक्त जाती” च्या मुलांसाठी तसेच अनाथ मुलांसाठी “गोवर्धन दराडे सर” मागिल ९ वर्षांपासुन वसतीगृह चालवतात, कारण सर सुद्धा लहानपणी ऊसतोड कामगार होते. ह्या वसतीगृहात १५० विद्यार्थी आहेत, त्यातील ५०-६० विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोड कामगार आहेत आणि त्यापैकी १४-१५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे शेतात ऊस तोडणी केलेली आहे, काही जण आजसुद्धा करतात. माझ्या सांगण्यावरुन सरांनी २०-२२ विद्यार्थ्यांना एका वेगळ्या खोलीत बसवले, जेणेकरुन मला विद्यार्थ्यांशी अधिक चांगला संवाद करता येईल. बाहेर रिपरिपणाऱ्या पावसाप्रमाणे मी एकसारखे प्रश्न विचारत होतो आणि पावसाच्या पाटाप्रमाणे त्यांचे अनुभव वाहत होते. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे होते, त्यांचे अनुभव ऐकता ऐकता माझ्याकडचे प्रश्न संपले. पण बाहेरचा पाऊस अजुन संपला नव्हता, मी माझे प्रश्न थांबवुन त्यांचे अनुभव मेंदूला झिणझिण्या न येऊ देता साठवून ठेवत होतो. त्यांच्या आई-वडीलांच्या कष्टाची त्यांना असलेली जाणिव त्यांच्या अनुभवकथनातुन व्यक्त होत होती. माझ्या साठी ह्या साखरशाळेचा अनुभव आनंददायी आणि दिशादर्शक होता. #WorldPhotographyDay च्या निमीत्ताने सर्व विद्यार्थ्यांसोबतचा फोटो म्हणजे माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण आहे.

          रात्री गोवर्धन सरांकडे मुक्काम झाला. सकाळी लवकर आवरुन तयार झालो, काल हरीदासचा फोन आला होता. सकाळी ज्ञानेश्वर सोबत निघालो, त्याच्या घरी पोहचताच जेवन उरकले. येताना गोवर्धन सरांशी थोडी चर्चा झाली आणि सरांचा निरोप घेऊन मी हरीदासला भेटायला गेलो, तेथे सचिन सर सुद्धा भेटले. थोडावेळ ऊसतोडणीच्या सरकारी आकड्यांवर आमची चर्चा चालु राहीली. पण, वेळेची मर्यादा लक्षात घेता मी तेथुन निरोप घेतला, कारण पुढे अंबाजोगाईला पोहचने निकडीचे होते. ज्ञानेश्वरने मला बीडच्या बसस्थानकाला सोडले. एव्हाना दूपारचे २:०० वाजले होते. तेथील अलिखीत नियमानुसार चौकशी कक्षातील हापीसर महोदय नियमाचे पालन करीत उडवाउडवीची उत्तर देऊन महामंडळाचे बीरुद सार्थकी लावीत होते आणि महामंडाळाच्या गाड्या सुद्धा भर पावसात (भारतीय) वेळ न चुकवता प्रवाश्यांच्या सेवेत हजर होत्या. शेवटी अस्मादिकांनी परत एकदा एका काळी-पिवळी चालकाला रोजगाराची संधी दिली. परंतु काळी-पिवळी चालकाच्या “पार्सल” पोहचवण्याच्या जोडधंद्याने अंबाजोगाईला पोहचता पोहचता तासभर उशिर केला. सायंकाळी ६:०० वाजता स्वारी अंबाजोगाई क्षेत्री उतरली. तेथे राजेश मुंडे भेटला. प्रवासात असताना त्याचे डझनभर मिस्ड़कॉल आले होते. पोहचल्यावर लगेच आम्ही तेथुन ८-९ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वडवणी गावात पोहचलो.

          तेथे राजेशच्या घरी जेवन उरकुन आम्ही तिकडच्या वस्तीत निघालो. एव्हाना सूर्यास्त झालेला असल्याने सावकाशपणे चिखलाची वाट तुडवीत आम्ही वस्तीत पोहचलो. तेथे राजेशने काही लोकांना जमा केलं. त्यांना लघुपटाबद्दल थोडी माहिती दिली आणि त्यातल्या एकाला प्रश्न केला की, “तुम्ही ऊस तोडायला कशाला जाता ? त्याच्याबद्दल थोडं विचारायचय”. क्षणाचाही विलंब न लावता हातातली ताडपत्री झटकत तो म्हणला, “हं….. कशाला म्हंजे? त्येचामुळच भाकर खाया भेटती मणुन जाताव”. नंतर त्याला थोड्या मवाळ भाषेत प्रश्न विचारीत माहिती घेतली आणि आम्ही पुढच्या घराकडं सरकलो. तिकड समोरच्या गोठ्यापुठं बसलेल्या एका म्हाताऱ्या माणसाकडं पाहुन मला तात्यांची आठवण झाली. प्रवासाच्या धावपळीत सगळ्यांची धावती भेट घेता घेता नकी नऊ आले होते. अश्यात समोर आलेल्या एक-दोन व्यक्तिंना काय प्रश्न विचारु तेच कळत नव्हत. राजेशने काही प्रश्न विचारुन बरीच मदत केली. तेथे एका मुकादमाशी ओळख झाली. त्याने वयाच्या दहाव्या वर्षापासुन ऊसतोडणीला सुरुवात केली होती आणि २०१४ साली ऊसतोडणी करणारा एक मजूर मुकादम झाला. त्याचं नाव “सुरेश बाबूराव उघडे”. वय ३० पूर्ण. वस्तीतल्या १० कोयत्यांना (जोडीला) ₹ ७० ते ८०हजार उचल देणारा मुकादम. अडीअडचणी उचललेल्या रकमेव्यतिरीक्त (हिशेब ठेऊन) मदत करत असतो. इतरांप्रमाणे चुकीचा हिशेब मांडुन तो एका उचलीवर मजुरांना दोन साल राबवून घेत नाही. प्रतीवर्षी बदलणाऱ्या (बदलवल्या जाणाऱ्या) प्रतीटण दराच्या त्यांच्या कमाईतले १८% गिळून तो इतरांप्रमाणे कारखाण्याकडुन डबल पैसे उकळत नाही. स्वतःच्या हिश्याला कारखाण्याकडुन प्रतीटणाच्या हिशेबाने येणारे पैसे तो घेत असतो. मजुरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन चुकीचा हिशोब मांडणारे आणि त्यांना एकदा उचल देऊन दोन-दोन वर्ष राबवुन घेणारे बरेच मुकादम त्यांने पाहिलेत. तो स्वतः ऊसतोडणी करत असताना त्याच्या मुकादमाने त्याच्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या जोडीला दोन-दोन तीन-तीन वर्ष राबवुन घेतलेलं त्यानं पाहिलय. दिलेल्या रकमेचा चुकिचा हिशेब मांडुन तो वसुल करण्यासाठी महिला कामगारांचे किंवा त्यांच्या मुलींचे लैंगिक शोषण करणारे बलात्कारी मुकादम देखील त्याने पाहिलेत. अश्याच काही कारणांमुळे ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील मुलींचे वयाच्या १४-१५ व्या वर्षीच लग्ण उरकले जाते. सुरेशने ह्या सर्व नरकयातना भोगलेल्या असल्यामुळे तो त्याच्या टोळीतल्या कोयत्यांना दिलेल्या उचलीचा हिशेब प्रामाणिकपणे सांगत असतो. सुरेश सारख्या काही मुकादमांमुळे सध्याच्या परिस्थितीत सकारात्मक बदल दिसुन येत आहेत. पण समस्या अजुनही संपल्या नाहीत. स्वातंत्र्याची ७० वर्ष पूर्ण झाल्यावर आज कुठे ह्या लोकांना दोन वेळचे जेवन मिळत असेल, ऊसतोडणीच्या ६ महिण्याच्या हंगामात जास्तित जास्त ₹ ५,००० महिना मिळत असेल (वर्षाचे उर्वरीत ६ महीने तर भीकच मागावी लागते), आजकाल ह्यांच्या मुलाबाळांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिळत असेल, आणि आत्ताकुठं ह्यांच्या परिवारातील माता-भगिणींचं लैंगिक शोषण कमी झालं असेल, तर मागिल ७० वर्षात कुण्याही राजकीय पक्षाचं / सत्ताधारी पक्षाचं ह्यांच्याकडं लक्ष का गेलं नाही असा प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण होतो.

          २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात १ करोड पेक्षा जास्त ऊस तोड कामगार आहेत. त्यापैकी ४० ते ५० लाख ऊसतोडकामगार कर्नाटक-तेलंगणा-आंध्र येथे ऊसतोडणीच्या हंगामात स्थलांतरण करतात. २०११ च्या आकड्यानुसार ९५% ऊसतोड कामगार अशिक्षीत आहेत. (उर्वरीत ५ टक्क्यांचं जास्तित जास्त ६वी-७वी पर्यंत शिक्षण झालेलं दिसुन येतं) अर्जुन तात्या सारख्या काही इतर ऊसतोड मजुरांच्या घट्टं पडलेल्या हाताला Finger Prints नसल्यामुळे त्यांच्याकडे आधारकर्डच नाही. कोणत्याही पक्षाने ऊसतोड मजुरांचा Vote Bank म्हणुन विचार केलेला नसल्याने बऱ्याच जणांकडे मतदान कार्ड सुद्धा नाहीत, (पण बोगस मतदानासाठी एका दिवसापुरतं मतदान यादीत आपोआप नाव येत असते) आणि एवढ्या मुलभुत गोष्टी नसताना (बोगस) राशन कार्ड सुद्धा (एजंट कृपेने) ह्याच्या नशिबात नाही. एकंदरीत काय तर स्वतःला भारतीय नागरीक म्हणवुन घेण्यासाठी संपूर्ण भारतातील ऊसतोड कामगारांच्या संख्येपैकी ४% लोकांकडे कसलाही पुरावा नाही, (आता कुणी ह्यांना देशद्रोही म्हणु नये ही हात जोडुन विनंती). आता बऱ्यापैकी लोकांचे वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याने ही टक्केवारी किती कमी झाली असेल ह्याच्यावर RTI टाकुन माहिती मिळणे देखिल अवघड आहे, कारण RTI Department कडे ह्याची यथायोग्य माहिती असेल की नाही ह्या बाबतीत थोडी शंकाच आहे. आता ही माहिती  २०२१ च्या जनगणनेनंतरच कळू शकेल. तो पर्यंत तरी २०१९ मध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ईलेक्शनमध्ये सर्व ऊसतोड कामगारांना न्याय मिळावा हीच सहिष्णू अपेक्षा आहे. मेंदूपटलावरुन कवटीला त्सुनामी लाटेसारख्या धडका बसव्या आणि एका फटक्यात आयुष्याचं भयावह चित्र नजरेपुढं उभं रहावं असा अनुभव मला होत होता. ऊसतोड कामगारांना किती नरकयातना भोगाव्या लागतात त्याची प्रचिती ह्या तीन दिवसात अनुभवायला मिळाली. विचारांच्या त्सुनामीला थांबवणे अवघड होतं. राजेशने मला परळी जंक्शनवर सोडलं. अस्मादिकांची स्वारी अग्णिरथात बसली. वाऱ्याच्या वेगाने गाडी पुण्याकडे धावत होती आणि मी त्सुनामीच्या वेगाने भूतकाळाकडे.

~ संकलित प्रवास वर्णन : सत्यम अवधूतवार.
संपर्क : ९६५७४३७०८६

आद्य शंकराचार्य और माहिष्मती नगर !

आज तारीख ३० अप्रैल २०१७, वैशाख शुक्ल पंचमी, सनातन (निसर्गनिर्मित) हिन्दू धर्म की वैदिक परम्परा को पुनरुज्जीवित करने वाले “प्रथम शंकराचार्य” की आज जयंती।  आद्य शंकराचार्य जी के जीवन की यह सर्वोत्तम उपलब्धि कही जा सकती है के उन्होंने ब्रम्हांड निर्मिती  के रहस्यपर, हजारो सालों से वैदिक और अवैदिक पण्डितो मे जो चर्चा चल रही थी , उस चर्चा का समाधान “अद्वैत वेदांत” से दे कर इस चर्चा को पूर्णविराम लगाया। आज हम उसी अद्वैत वेदांत के बारे मे विस्तृत रूप से जानकारी लेंगे।

 

भारतीय धर्म मुख्यतः दो विभागों मे बटे हुए है, पहला – वैदिक धर्म, और दूसरा – अवैदिक धर्म। जिन्हे हम आस्तिक धर्म और नास्तिक धर्म कह सकते है, आस्तिक और नास्तिक की संकल्पना  ईश्वरकेन्द्रित नही है, यह संकल्पना वेदों से सम्बंधित है, अर्थात वेदाभ्यास कर के वेदप्रामाण्य स्वीकार करने वाले धर्म “आस्तिक धर्म” है, और वेदाभ्यास कर के वेदों को अस्वीकार करने वाले “नास्तिक धर्म” है. वेदप्रामाण्य स्वीकारने वाला सनातन हिन्दू धर्म आस्तिक धर्म है, चूंकि जैन धर्म और बौद्ध धम्म वेदप्रामाण्य अस्वीकार करनेवाले नास्तिक धर्म है. (पौराणिक कथाओं मे चार्वाक नाम के ब्राम्हण व्यक्ति को वेदप्रामाण्य अस्वीकार करने वाला पहला नास्तिक बताया गया है, लेकिन चार्वाक ने अपने तत्व के आधार पर किसी पंथ या समुदाय की स्थापना नहीं की.)

 

आद्य शंकराचार्य जी का जन्म सन ७८८ में केरल के एक गांव में हुवा, उपनयन संस्कार होने के बाद किशोरअवस्था मे, उन्हों ने अपने माता से अनुमती लेकर संन्यास स्वीकार किया, और वेदों का शुद्ध अध्ययन करने हेतु वे अपने नए गुरु को खोजने के लिए हिमालय की ओर प्रवास करने लगे.  रास्ते मे उन्हें गोविन्द भगवद्पाद नाम के एक ऋषि मिले, उन्हों ने जब शंकर से पूछा “तुम कौन हो? ” , तब शंकर ने संस्कृत की छह पंक्तियों मे अपना परिचय दिया, जिसे “निर्वाण षट्कम्” के नामसे जाना जाता है. किशोरअवस्था के एक विद्यार्थी की असामान्य बुद्धिमत्ता से खुश हो कर, उन्हों ने शंकर को अपना शिष्यत्व प्रदान किया। आज से पहले गोविन्द भगवद्पादाचार्य जी ने इतने कम शब्दों मे इतना अर्थपूर्ण परिचय नहीं सुना था.

 

गुरु गोविंद भगवद्पादाचार्य जी के मार्गदर्शन में शंकर ने शास्त्रशुद्ध वेदाभ्यास पूर्ण किया। लेकिन वेदाभ्यास कर के किसी आश्रम मे अपना जीवन व्यतीत करना उन्हें उचित नहीं लगा, तभी उन्हों ने भारतभ्रमण कर के, अवैदिक पंडितोंद्वारा वेदों पर होने वाले आरोपों का निरासरण करने का फैसला लिया। वे सारे भारत मे भ्रमण करते रहे, और वेदों पर हो रहे आरोपों का उन्हों ने तर्कशुद्ध उत्तर दिया। लेकिन एक चर्चा का विषय  ब्रम्हांड निर्मिती के रहस्य के बारे मे था, जहाँपर शंकराचार्य उचित प्रतिवाद नहीं कर सके. क्योकि, उन्हों ने केवल वेदों काही अध्ययन किया था. लेकिन अवैदिक पंडित दोनो विषयों का अध्ययन करते थे, इसी लिए उन्हें वैदिक और अवैदिक विषयों की सकारात्मक और नकारात्मक बाते अच्छेसे पता थी. उलटा शंकराचार्य जी को अवैदिक तत्वों के बारे मे ज्यादा जानकारी नहीं थी. तब वे वापिस अपने  गुरु के पास गए, और उन्होंने अवैदिक तत्वोंका अध्ययन किया। उन्होंने अपने गुरु से कहा, के मै अब वैदिक-अवैदिक चर्चा करने के लिए तैयार हु. आप मुझे किसी बुद्धिमान पंडित का नाम बताईये जिसने मेरी तरह वैदिक-अवैदिक तत्वो का पूर्ण अभ्यास किया हो. तब गुरु गोविन्द भगवद्पादाचार्य जी ने उन्हें ओंकारेश्वर मठ के ऋषि  “कुमारिल भट्ट” का नाम सूचित किया, और वे कुमारिल भट्ट्से चर्चा  करने के लिए ओंकारेश्वर चले गए. जब वे उन के मठ में पहुंचे तब उन्हों ने अचंबित करने वाला दृश्य देखा। वहा पर कुमारिल भट्ट अपने पापों का प्रायश्चित्त करने के लिए आत्मदहन कर रहे थे, जैसे ही शंकराचार्य जी ने उनको अपने आने का कारण बताया, तो कुमारिल भट्ट्ने उन्हें महिष्मति नगर के प्रख्यात पंडित “मंडन मिश्रा” से चर्चा करने का सुझाव दिया।

 

कुमारिल भट्ट का कहना मान कर शंकराचार्य महिष्मती की ओर निकले, वहां पर वे मंडन मिश्रा के घर गये. मंडन मिश्रा एक गृहस्थाश्रमी पंडित थे, उनकी पत्नी “सरस्वती उभया भारती देवी” भी वेदशिक्षित थी. शंकराचार्य जी ने अपने आने का कारण बताया और मंडन मिश्रा उनके साथ चर्चा करने के लिए तैयार हो गए. इस  चर्चा के अध्यक्षस्थान पर मंडन मिश्रा की पत्नी सरस्वती देवी थी. (कुछ लोग आज भी इस संभ्रम में जीवन व्यतीत कर रहे है के, हिन्दूधर्म मे महिलाओं को वेदाभ्यास का अधिकर ही नहीं था.) मंडन मिश्रा की और शंकराचार्य की चर्चा चलती रही, मंडन मिश्राने शंकराचार्य के अद्वैत वेदांत के प्रतिवाद में (कर्म/ऊर्जा/चेतना) पर आधारित द्वैत वाद चर्चा मे रखा. और शंकराचार्य जी ने अद्वैत वेदांत सिद्ध करने के लिए वैदिक-अवैदिक तत्वों का तुलनात्मक विवेचन कर के, दोनों तत्वों की समानताए चर्चा मे बताई, और अद्वैत वेदांत को सब के सामने सिद्ध किया. और मंडन मिश्राजीने भी शंकराचार्यजीका अद्वैत वेदांत स्वीकार किया। और मंडन मिश्रा कि पत्नी सरस्वती देवीने भी शंकराचार्य जी के पक्ष मे निर्णय दिया. लेकिन, उन्होने शंकराचार्य जी के अद्वैत सिद्धांत को अस्वीकार किया, और कहा के, उनके  प्रश्नों का योग्य उत्तर उन्हें देना पड़ेगा, तभी मिश्रा दंपती शंकराचार्य जी के अद्वैत सिद्धांत को स्वीकार  करेगी (अगर मिश्रा दम्पती चर्चा में हार जाती तो उन्हें शंकराचार्य जी का शिष्यत्व स्वीकार करना पड़ता, अगर शंकराचार्य जी हार जाते तो उन्हें सन्यास छोड़ कर गृहस्थाश्रम स्वीकारना पड़ता। सरस्वती देवी ने अपने पती मंडन मिश्राको अध्यक्षस्थान पर बिठाया और उन्होंने चर्चा में सहभाग लिया)

सरस्वती देवी ने उन्हें कामजीवन के सम्बन्धी प्रश्न पूछे, तब  शंकराचार्य जी ने कहा के, यह चर्चा का विषय नहीं है. लेकिन सरस्वती देवी ने उन्हें उत्तर देते हुए कहा के, युद्ध में और चर्चा में सारे नियम, सारे विषय एक समान है, अद्वैत है. और आप को मेरे सभी तरहके सवालों का जवाब देना होगा, जब सभी विषयोंका सार अद्वैत है, तो किसी एक विषय में रुचि  न दिखाकर आप मेरे द्वैतवाद को अप्रत्यक्ष रुप से सिद्ध कर रहे है. तब शंकराचार्य जी ने सरस्वती देवी से अनुमती मांगी के उन्हें एक महीने का अवसर दिया जाए. कुछ दिनों बाद एक राज्य के राजा की मौत हो जाती है, तभी शंकराचार्य के  शिष्य उन्हें सलाह देते है के वे उस राजा के शरीर मे परकाया प्रवेश करे और कामजीवन का (शुद्ध हेतुसे) अनुभव ले, और अपना ब्रम्हचारित्व अबाधित रखकर अपना प्रायश्चित्त करे. शंकराचार्य जी के पास दूसरा मार्ग नहीं था, वे गृहस्थाश्रम स्वीकार नहीं कर सकते थे, लेकिन सरस्वती देवी ने उन्हें पराजित करने के लिए जो प्रश्न पूछा था उसका उत्तर अनुभव के बिना देना संभव नहीं था. शंकराचार्य जी ने राजा के देह मे प्रवेश किया, और कामजीवन का अनुभव लेकर बाहर आये, अपने आध्यात्मिक शक्तिसे राजाको पुनर्जीवित किया, और दोनो के सामने अपना प्रायश्चित्त किया। फिर वे माहिष्मती की ओर निकले, और चर्चा में मिश्रा दम्पतीके सामने उन्होंने सभी प्रश्नोंके जवाब दिए, और सभामे फिर से अद्वैत वेदांत को सिद्ध किया और मिश्रा दम्पती ने गृहस्थाश्रम छोड़ कर शंकराचार्य जी का शिष्यत्व स्वीकार कर लिया। और अंतिमतः ब्रम्हांड निर्मिती के रहस्य को लेकर जो चर्चा हजारो सालों से चल रही थी उस चर्चा को अद्वैत वेदांत का समाधान दे कर इस सारी चर्चा को पूर्णविराम लगाया।

 

मंडन मिश्राजी का द्वैत वाद – ” ब्रम्हकण एक सुप्त अवस्था में है, और बाह्य ऊर्जा/चेतना मिलने की वजह से वह अपने मूल रुप से बाहर आकर ब्रम्हांड बन चूका है, जैसे बीज को खाद एवं पानी देने से वह कुछ दिनों बाद वृक्ष बन जाता है. लेकिन कोई भी बीज खाद या पानी के बिना वृक्ष नहीं बन सकता। मतलब ब्रम्हांड निर्मिती जिस ब्रम्हकणसे हुई है, वो किसी बाह्य ऊर्जा/चेतना मिलने से ही अपना मूल रुप छोड़कर ब्रम्हांड बन गया है. (यहां पर ब्रम्हकण और बाह्य ऊर्जा यह दो महत्वपूर्ण घटक मंडन मिश्रा जी ने द्वैतवाद मे बताये थे)

शंकराचार्य जी का अद्वैतवाद – ” सारे ब्रम्हांड का मूल एक ब्रम्हकण है (जो पराभौतिकी अवस्था मे है, ब्रम्हकण अद्वैत है, स्वयंभू है), ब्रम्हकण ने स्वयं से ब्रम्हांड का स्वरुप धारण किया है, और वह स्वयं ही लय अवस्था तक जायेगा, कोई भी बाह्य ऊर्जा/चेतना ब्रम्ह को प्रभावित नहीं कर सकती (अर्थात ब्रम्हकण स्वयंभू है). जैसे कोई भी सजीव हो उन्हें भौतिकी वातावरण में निर्मिती एवं विनाश के लिए ऊर्जा की आवश्यकता पड़ती है, लेकिन ब्रम्हांड के हर एक सजीव निर्जीव वस्तुओं में जो ब्रम्हकण का अस्तित्व है, वह केवल पराभौतिकी अवस्था मे ही होता है. अर्थात द्वैतवाद का उपयोग भौतिक विश्व में होता है, पराभौतिक विश्व मे नहीं हो सकता, और ब्रम्हांड की निर्मिती  पराभौतिकी अवस्था मे हुइ है.

  • पराभौतिकी विश्व के अद्वैत सिद्धांत का भौतिकी उदाहरण देते हुए शंकराचार्य जी ने कहा के, हम एक व्यक्ति है, लेकिन अपने माता-पिता के लिए हम बेटे है, अपनी पत्नी के लिए हम पति है, अपने बच्चोंके लिए हम माता-पिता है, अपने भाइ-बहनोंके लिए हम भाई-बहन है,  किसी अपरिचित व्यक्ति के लिए हम मित्र है. हम एक ही व्यक्ति है, लेकिन हर व्यक्ति के प्रती हमारा सम्बन्ध भिन्न भिन्न है. वैसेही, माता के गर्भ में (पराभौतिकी अवस्थामे) हम एक पिंड है, मरनेके बाद हमारा पिंडदान किया जाता है. जन्म और मृत्यु की अवस्थामे हम पराभौतिकी अवस्थामेही होते है. चूँकि, हमारे पिंडकी तुलना हम ब्रम्हकणसे कर सकते है.)

अद्वैत वेदांत का सार –  ।। ब्रम्हम् सत्यम् जगत् मिथ्या ।।

अर्थ – ” केवल ब्रह्मकण (ब्रम्ह) ही परमसत्य है, बाकी सारा भौतिक विश्व् ब्रम्हऊर्जा का आभास है ”

सन २००७ मे ब्रम्हांड का रहस्य खोजने के लिए Big Bang Experiment किया गया,  जिस के report में स्पष्ट रूप से god particle के बारे में बताया गया है. आद्य शंकराचार्य जी ने ८ वी शताब्दी में दुनिया को अद्वैत वेदांत के अंतर्गत ब्रम्हकण के बारे में बताया था। शंकराचार्य जी ने बताया हुवा ब्रम्हकण , Big Bang Experiment के report में बताया हुवा god particle ही है. अर्थात हमारे ऋषि महर्षियो  ने योगिक एवं आध्यात्मिक शक्तिओ से बुद्धि की पराभौतिकी अवस्था में निसर्ग का अध्ययन किया है, इन दो बातो मे केवल इतनाही अंतर है के, उसे २१ वी शताब्दीमें वैज्ञानिको ने प्रत्यक्ष रूप से सिद्ध किया है. यही एक प्रमुख वजह है के हमारे ऋषि महर्षि नवग्रहों की स्थिती के बारे मे जानकारी रखते थे, सूर्य  पृथ्वी के दरम्यान का अंतर, दो ग्रहों के दरम्यान का अंतर, और इसके आधार पर सूरज और चंद्र तारों की गती का अभ्यास कर के समय एवं दिनदर्शिका सटीक रूप से बनाते थे, वे आज भी इतनी सटीक, अचूक और निर्दोष है, के English Calendar  की तरह हमें लिप वर्ष बनवाना नहीं पड़ता, चाहे वो, सूर्यग्रहण हो चंद्रग्रहण हो या हमारे त्यौहार हो, सभी पूर्णतः अचूक समयपर ही होते है. हमारा देश वेदप्रामाण्य स्वीकार करनेवाला और वेदप्रामाण्य अस्वीकार करनेवाला दोनों धर्मों का देश है, यही हमारी सहिष्णुता का सबसे बड़ा प्रतिक है. नास्तिक धर्मोने वेदोंको सिर्फ वैचारिक विरोध किया, विरोध दर्शाने के लिए कोई हिंसाचार नहीं किया, और उनका विरोध स्वीकार कर हमने वेदोंकी एवं हिन्दू धर्म की मीमांसा की. और हम नास्तिक धर्म को अप्रत्यक्ष रूप से धन्यवाद करते है, के उनके वजहसे हम वास्तविक और विज्ञान आधारित विचारोंसे जुड़े रहे. वरना हिन्दू धर्मकी अवस्था भी पाश्चिमात्य देश के धर्मो जैसी बन जाती।

 

सभी भारतीयों को आद्य शंकराचार्य जी के जयंतीकी मंगलमय शुभ कामनाये, इस राष्ट्र की सर्वांगीण प्रगती के लिए हम आजन्म कटिबद्ध रहे.

|| अहम् ब्रम्हास्मी ||

 

 

~ संकलक एवं लेखक

सत्यम अवधूतवार

सेक्युलर शिवाजी.

ह्या ब्लॉगचं नाव ऐकुन बऱ्याच जणांचे डोळे चमकले असतिल. हे सर्व लिहीण्यामाघे कारणही तसच आहे, “ही कैफियत मांडावी तरी कशी?” हेच कळत नव्हते. जिकडे पाहावं तिकडे शिवरायांना सेक्युलर बनविण्याचे प्रयत्न चाललेला दिसतोय.
सांगायचा मूळ मुद्दा असा की WhatsApp वर बऱ्याचवेळा मॅसेज येतो की शिवरायांच्या सैन्यामध्ये एवढे-एवढे टक्के मुस्लिम सैनिक होते. मग हा व्यक्ति ह्याचा प्रमुख होता, दुसरा कोणतरी त्याचा प्रमुख होता, बघा बरं आपले शिवराय किती मुस्लिम प्रेमी होते, अफजलखानाला मारल्यानंतरही त्याची कबर बांधली, शाहिस्ताखानाने डायरीत काहीतरी लिहुन ठेवलं, पाहा बरं मुस्लिम लोक हे आपले शत्रु नाहीत, वगैरे वगैरे. आणि पाहा बरं हे हिंदूत्ववादी लोक कसे शिवरायांना कट्टर हिंदूत्ववादी दाखवुन मुस्लिमांविरुद्ध भडकवतात, वगैरे वगैरे.

अश्या प्रकारचे मॅसेज पाठविणाऱ्यांची मानसिकता दोन प्रकारची असु शकते, एक – ते संपूर्णत: हिंदू विरोधी आहेत आणि हिंदू हा शब्दच त्यांना सहन होत नाही(ते जाणिवपुर्वक असे मॅसेज टाकतात), दुसरे – त्यांना शिवरायांच्या इतिहासाचं जराही ज्ञान नाही (उगाच कुणाच्याही वैचारीक प्रवाहात वाहत जाणारे ओंडके). ईथे मला एक गोष्ट स्पष्ट करावी वाटते की शिवाजी महाराज हे जातीभेद करणारे नव्हते, अर्थात त्यांना जातीभेद मान्यच नव्हता. मुघलांच्या/आदिलशहाच्या दरबारी विद्रोह करणाऱ्या मुस्लिम सरदारांना शिवरायांनी सैन्यात स्थान दिले. ह्या मागचे कारण असे की शत्रुंचे कमजोर दूवे आपल्याला कळायला पाहिजे, आणि लक्षात घेण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे शत्रुचा शत्रु हा आपला मित्र ह्यावचनी शिवरायांनी त्यांना जवळ केले (कारण; आप्तस्वकियांचा/नात्यातील लोकांचा वाईट अनुभव पदराशी होता). मराठ्यांचे (सपाट रणमैदानात) भुगोलाबाबतचे अज्ञान आणि मर्यादित शस्त्रांचा वापर येत असल्याने उत्तरेकडील मोहीम जिंकण्यासाठी “ईब्राहिम खान” तोफखान्याचा प्रमुख होता. कारण मराठ्यांना रणांगणात तोफ चालविण्याचा अनुभव नव्हता, अर्थात मराठ्यांच्या टोळ्या लहान असायच्या, तोफेसारखी अवजड शस्त्रे सह्याद्रीच्या डोंगरकड्यातुन युद्धासाठी वाहुन नेणे अशक्यच होते. शिवरायांचा ठरलेला नियम म्हणजे युद्धाला जाताना आवश्यक तेवढीच शस्त्रे जवळ बाळगावी,आणि गनिमी काव्याने शत्रुवर मात करावी. ह्याच कारणामुळे मराठ्यांनी रणमैदानी कधी तोफा वापरल्याच नव्हत्या. म्हणुन अनुभवी व्यक्तिकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली होती.  “इब्राहिम खान” यांची मराठी दौलतीप्रती असलेली निष्ठा कुणीही नाकारू शकत नाही, पण एका इब्राहिम खानामुळे संपूर्ण मुस्लिम जमात  पाक-पवित्र होत नाही, हे म्हणजे डॉ. एपीजे अब्दुल कलाम सरांकडे बोट दाखवून संपूर्ण मुस्लिम समाजाची वकिली करण्यासारखे आहे.

आप्तस्वकियांकडुन होणारा विरोध मोडुन काढण्यासाठी शिवरायांनी जातीभेदावर प्रहार केला, आपण सर्वांनी इतिहासात वाचलेले आहे की शिवराय प्रत्येक मावळ्याशी मैत्रीपूर्वक वागायचे त्यांना गुलामासारखी वागणुक चूकुनही दिली नाही. प्रत्येक जातीच्या मावळ्याला मनातुन वाटायचं की शिवराय हे आमच्या सर्वांचे राजे आहेत.आणि हिच शिवरायांची कमाई आहे.
वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदीरात मावळ्यांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, (मशिद/दर्ग्यामधे नमाज पढायला गेले नव्हते).  हर हर महादेव  ची ती ललकारी आजही शत्रुंच्या कानात घुमत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान गनिमी काव्यानं फाडला, शिवरायांनी वेळोवेळी अफजलाखानाला हेच दाखविले की तो किती मोठा शूरवीर मातब्बर योद्धा आहे, अन मी काल परवा लढाई शिकलेला सरदार. कारण अफजल खानाविरुद्ध रणमैदानात लढाई करणे अशक्य होते, म्हणुन शिवरांनी त्याला भेटीसाठी बोलावले आणि ठरलेल्या दिवशी संपूर्ण तयारीने त्याला सामोरे गेले, आणि तो दिवस आपण दरवर्षी “शिवप्रतापदिन” म्हणुन साजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू नव्हते, ते किती मुस्लिमप्रेमी होते. हे सांगण्यासाठी काही स्वयंघोषित इतिहासकारांनी निद्रासंशोधन करुन त्यांच्या सैन्यातील मुस्लिमांची संख्या किती टक्के होती हे तिखटमीठ लाउन सांगितले. अर्थात शिवरायांच्या सैन्यात ईतर धर्माचे सैनिकच नव्हते असं मी म्हणत नाहीए, ते होते, पण त्यांना ठेवण्यामागिल कारण म्हणजे शत्रुविरोधात रणनिती आखण्यासाठी अनुभवी मुस्लिम सरदारांची मदत व्हावी, कारण ह्या गोष्टी फक्त त्यांनाच माहित असायच्या !  आणि सर्वात महत्वाचं शिवरायांचे जे बारा अंगरक्षक होते, त्यात एकही मुस्लिम सरदार नव्हता. राज्याभिषेकानंतर स्थापन केलेल्या अष्टप्रधान मंडळात एकही मुस्लिम सरदार नव्हता. औरंगजेबाच्या दरबारी मान खाली घालणारे महाराणा प्रतापांचे वंशज पाहुन शिवरायांना मेल्याहुनही मेल्यासारखे झाले होते. ज्या मुघल सलतनतीच्या  ईस्लामी बादशहांनी धार्मिक आधारावर राज्य चालविले, ती सत्ता मिळविण्यासाठी स्वत:च्या भावाचा, जन्मदात्या बापाचा ज्या औरंजेबाने खुन केला तो सुफिसंत ! आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन त्यांचे रक्षण करणारे शिव-शंभु हे हिंदू नव्हे तर धर्मनिरपेक्ष ?

शिवरायांनी कधीही कुण्याही जातीचा / धर्माचा द्वेष केला नाही. कारण तशी शिकवण जिजाऊ माँसाहेबांनी शिवरायांना दिलीच नाही, जिजाऊ माँसाहेबांनी रामायण – महाभारतातील शौर्यकथा सांगुन त्यांच्यावर संस्कार केलेत. शहाजीराजांनी शिवरांना दिलेला राजकीय उपदेश हा धर्मरक्षणासाठी होता, हिंदवी स्वराज्यासाठी होता. हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे.

यवनांच्या पदरी विश्वासघाताशिवाय काहीही मिळणार नाही” हे स्वत: शहाजीराजांचे अनुभवाचे बोल आहेत.

 

आजकाल एक नविन Trend आलाय .!!

शिवराय हे किती सेक्युलर होते, हे लोकांना सांगायचं, मग इंटरनेटवर  जिकडंकुठं शिवरायांबद्दल Readymade Material मिळेल तेवढं उचलायचं आणी दुसरीकडे विशिष्ठ जातीला टार्गेट करुन  लगेच फेसबुक व्हाट्सअपला चिटकावून द्यायचं, त्या लेखामध्ये काही सत्य असो किंवा नसो परंतु ते हिंदू धर्मावर टिका करणाऱ्या/शिव्या देणाऱ्या कुण्यातरी डाव्या विचारसरणीच्या लेखकाने लिहलय नाऽऽ. मंग बास्स…… इतनाही काफी है.  आपल्या Social media च्या profile मध्ये शिवभक्त लिहायचं, शिवरायांसोबत मोठेमोठे ‘banner’ बनवून गल्लीत, नाक्यावर, चौकत लावायचे. “शिवभक्त” नाव असणारं टि-शर्ट घालायचं, गाडीवर स्टिकर लावायचे, दिवसभर दहा प्रकारचे गुटखे/तंबाकू खाऊन पिचकार्या मारायच्या, आणि उठता बसता जय शिवराय चा नारा द्यायचा एवढं केलं की तुम्ही झालातच Readymade शिवभक्त. त्यानंतर आपला Social Media Activeness दाखविण्यासाठी पुरोगामी व प्रतिगामी असे गट पाडून वैचारीक बुद्धिभेद लढवायचे, संघटनेकडे बुद्धि गहान ठेवायची, एकमेकांना येथेच्छ आई-बहिणींवर शिव्या घालायच्या, हिंदू धर्माला शिव्या घालायच्या, गोल फिरुन जातीवर यायचं, छातीठोकुन जोरजोरात ओरडुन सांगायचं की; मी किती जातीवंत आहे, आणि शिवाजी महाराज हे आमच्या जातीचे होते, वगैरे वगैरे. आपापल्या निवडीनुसार तिथी/तारखेचा वाद रंगवायचा की झालातच तुम्ही सार्वजनिक Social Media वाले शिवभक्त.

परंतु, खरंच या सर्वात आपले शिवराय कुठे आहेत?? याचा विचार नाही करायचा! त्यांनी काय केलं?? का केलं?? कसं केलं?? कुणासाठी केलं?? शिवरायांच सार्वजनिक जीवन कसं होतं?? त्यांना रयतेचा राजा का म्हणायचे?? शत्रुंच्या / परधर्मातील स्त्रियांनादेखिल सन्मानाची वागणुक का दिली?? ह्याचा आपण कधी विचारच करीत नाही, शिवरायांच्या चरित्रातील कोणता एक गुण मला अंगिकारण्यासारखा आहे?? हा विचारच नसतोच. खरा शिवभक्त व्हायचं असेल तर शिवराय आपल्या आयुष्यात कसे येतील हे पाहायला हवं. आपल्या वर्तनातुन ते स्पष्ट व्हायला हवं , आज प्रत्येकाला हातात तलवार घेउन शिवाजी, संभाजी बनायची हौस लागलीय , परंतु स्वामिनिष्ठ मावळे कुणाला व्हायचय??  खरचं शिवरायांना आपल्याकडून हेच  अपेक्षित होतं का ?? त्यांनी फक्त मराठा जातीच्या लोकांसाठी हिंदवीस्वराज्याची स्थापना केली होती का?? जात व्यवस्थेचा धिक्कार करुन सर्व समाजाला एक सुत्रात बांधणारी संतांची परंपरा शिवरायांनी राजकीयरित्या पुढे चालविली आणि आपण करंटे **कूळी जातीवंत मराठा अमुक-अमुक पोटजातीचा मराठा करुन ऊर बडवून घ्यायलो !  शिवराय, शंभूराजे मराठ्यांचे झाले, बाजीराव, टिळक, सावरकर ब्राम्हणांचे, महात्मा फूले माळी जातीचे , बिरसा मुंडा फक्त आदिवासी लोकांचे, बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे,  ही अशी जातीनिहाय वर्गवारी करणे कितपत योग्य आहे ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.

हिंदवीस्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज” हे व्यक्तिमत्व जातीचा टॅग लावून मिरवण्याचा नव्हे तर आपल्या मनावर गिरवायचा आणि आयुष्यात जिरवायचा आहे.


|| जातीभेद छोडो , हिंदूत्वसे नाता जोडो ||


माहिती संकलन आणि लेखन – © सत्यम  अवधूतवार

Twitter – @Chitrakarmee

WordPress – @IntolerantSaffron.

Modi, Putin and Trump : Decline of Islamic Terror.

R.P.’s Presidential candidate Mr. Donald J. Trump won the election by 276 Votes, and becames the 45th president of U.S.A. 

when I read this breaking news on social media, then My reaction was same when Modi becames P.M. of India. Afterward in few hours there were #Trolling & Updates  about the Trump, that the (so called) Feminist community of U.S.A. started a protest against him (using their FOE) by chanting that, He is against the Muslim Community and Feminism. And how Racist he is ! (that he will treat negros like slaves) etc……

As you will think that Why I am Advocating Mr. Trump? 

I would like to clear that I do not support Trump (nor Hillary) and that is too after having a information about his attitude towards the ladies (affairs, sex scandle involvement, harassment cases) and his capitalist mindset and absence of etiquettes too. The main question is that ” why citizens of U.S.A. elected Trump as a President? “. As many intelligent people will tell their political opinion, but here I would like to underline a word – “Islamophobia“.

In the western continents like Europe and America, the rising number of TERRORIST attacks on the name of ISLAM by ISIS, Taliban, Al-Quida, etc, are purely responcible for the birth of ISLAMOPHOBIA. So, the citizens in those countries getting realise that the muslim community is very much aggressive (harmful), when the priority comes about Religion. That muslim community blindly follows the orders of MULLAH & MAULAVI On the name of “ Disciple of Sharia & The Holy Quran  (Which actually do not order to kill people on the name of Religion, the concept of JIHAD is about to kill the bad things inside us, but so called “ Angles of ISLAM ” are disagree with this & Secularism too). As the intelligence agencies of respective western countries found that the Every Terrorist attacks has direct or indirect involvement of Muslim Community or any single Muslim Person who one is citizen of that respective country. 

The “ISLAMOPHOBIA” mindset of American peoples had shown the results of Presidential  Election in 2016. I remember that one year ago when Republican Party declares “DONALD TRUMP” as their Candidate, and in his first speech he openly stated that ” If I became a president, I will ban Muslims entry in America. ” As everyone know that what should Hillary Clinton needs to set a political strategy for election as a Opposition !  Here we can see that both of the candidates are some how diretcly/indirectly belongs with Underworld Mafias, both have Capital power, both are the residents of supreme class of the society, but both are not same about political ideology. TRUMP & HILLARY adopted the idea of ISLAMOPHOBIA & FEMINISM respectively. 

Trump started the hate politics against muslim community (which is actually a growing mindset of Americans). Afterwards he started following the operations and surgical strikes done by EUROPIAN Countries, specially a powerfull DRONE ATTACK by Russia’s President Vladimir Putin. At the time of ” 9/11 Terrorist attack on WORLD TRADE CENTER ” Vladimir Putin suddenly supported America to fight againt Islamic Terrorism. As he also benefited as a Friend Nation in ASIA to maintains his International relations with U.S.A. One year ago when Presidential candidates are declared in U.S.A., before that time there was another trending news in same year about the Drone Attack by Vladimir Putin against ISIS & at their camps located in Siria. After that attack  Vladimir Putin was praised by the International Media and Islamic nations too (who actually don’t want the religious dictatorship of ISIS/AL-QUIDA to rule their country), DONALD TRUMP decided to make it political agenda for the PRESIDENTIAL ELECTION.


Whenever Narendra Modi visited U.S.A. Donald Trump used to meet him unofficially, that as per his selfishness he also needs a ready made SOCIAL MEDIA STRATEGY , which was a 100% successfull attempt in Democratic type of countries (as he can’t have a risk a with a new experiment), as he adopted the Social Media Strategy of Narendra Modi in 2014’s Election in INDIA. Additionally he connects the concept of his Eternal agenda i.e. “Muslim Hate Politics” to the Safety of the Country. Where Internation Media had projected his image as a RACIST, but I was always surprised by his faith about INDIAN CULTURE, PEOPLE and HINDUISM (there may be a political propaganda, I think so…) . But its not only about the HATE POLITICS against the Muslim Community, its like the FRUITS OF KARMA to be faced by Muslim Community because of ” Angles Of ISLAM. ”

About Modi it is clear that he is 100% against the Terrorism, but to maintain the healthy relations with other ISLAMIC NATIONS (who are also facing the problem of Dictatorship of RELIGION, as their FRUIT OF KARMA) not labling it as a ISLAMIC TERRORISM.

About Putin it is undoubtly clear scenario that Putin is really very very stricts about the policy against ISLAMIC TERRORISM, but he haven’t stated like TRUMP (as he really don’t need this).

About the 45th President of U.S.A. it is already clear that how he is going.

As the world is facing the problem of ISLAM sponsored TERRORISM, which is slowly changing the mindset of people in the world to HATE ISLAM, which has actually became a political agenda (ISLAMOPHOBIA) in U.S.A.’s Presidential election. Somewhere its like a RED ALERT to all muslim community around the world to think out of the (Narrow) Religious Boundries, as Mullah & Maulavi teaches to hate NON-MUSLIMS people and brainwash them on the name of JIHAD and use them to fight for it. If Muslim community do not think about stopping such terrorist activities, otherwise there will be official defination of TERRORISM. It is a time for Muslim Community for chanting loudly………

YES, WE ARE AGAINST RELIGIOUS TERRORISM

~ Blog written by : © Satyam Avdhutwar.

Twitter : @AvdhutwarSatyam

WordPress : @IntolerantSaffron

प्रसारमाध्यमांचे अधिकार आणि कर्तव्य.

​NDTV ह्या खाजगी वृत्तवाहिनीवर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने “राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाअंतर्गत” एक दिवसाची बंदी लावली होती. त्यानंतर विविध सामाजिक स्तरातुन आणि समाजमाध्यमांतुन ह्यावर उलट-सुलट चर्चा, समर्थन, निषेध, हॅशटॅग ट्रोलींग वगैरे वगैरे याचा पुर आला, आणि ह्या पुराला (आंतरराष्ट्रीय स्तरावर) त्सुनामी बनविण्याचे (भगीरथ यत्न) कसे सुरु झाले हे आपण अनुभवत आहोत. त्यातल्या त्यात ही बंदी म्हणजे (हूकुमशाही विचारांच्या) सरकारने सुरु केलेली दडपशाही नव्हे नव्हे तर अघोषित आणीबाणीच आहे, हे बेंबीच्या देठापासुन ओरडुन ओरडुन शक्य त्या माध्यमातुन सांगण्यात (मनावर ठसविण्यात) येत आहे. मग ते वृत्तपत्र असो, रेडीओ असो, समवैचारिक वृत्तवाहिण्या असो,  अथवा फेसबुक/ट्विटर  असो.  

जेंव्हा ह्या प्रकरणाबद्दल मी वाचले तेंव्हा बरेच प्रश्न डोक्यात आले. 

* ही खरंच अघोषित आणीबाणी आहे का? 
* जर बंदी घालायचीच होती तर 2014 मध्येच का नाही घातली?
* जर NDTV वर बंदी घातली नसती तर काही फरक पडला असता का?
* NDTV ची पत्रकारिता ही निष्पक्ष आहे का?
* खरंच NDTV च्या पत्रकारांनी (राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर) आत्मपरिक्षण करायला पाहिजे का?

एक नाही असे अनेक प्रश्न समोर नाचत होते, ह्या बंदीची तुलना (तथाकथित अघोषित आणीबाणी म्हणुन) जर इंदिरा गांधीच्या काळातील दोनवर्षांच्या आणीबाणीशी केली तर काही ठळक मुद्दे नजरेत येतात ते असे :

* NDTV ह्या वृत्तवाहिणीवर सरकारने अधिकृतरित्या सकारण बंदी लावली होती, इंदिरा गांधींनी आणीबाणीचे कारणच घोषित केले नव्हते. (आंतराष्ट्रिय दबाव येउ नये म्हणुन “अंतर्गत कलह सोडविण्यासाठी उपाययोजना” असे कारण नंतर जाहिर करावे लागले ).

* NDTV वर लावलेली बंदी (तथाकथित अघोषित आणीबाणी) ही 24 तासांसाठी होती, इंदिरा गांधींच्या काळातील (सहिष्णू) आणीबाणी 25  जून 1975 पासुन 21 मार्च 1977 पर्यंत (21महिने) होती.

* सरकारने कोणत्याही विपक्ष नेत्याला/विरुद्ध विचारसरणीच्या संघटणेतील लोकांना अटक केलेली नाही. इंदिरा गांधीच्या काळात सर्व विपक्षातील प्रमुख नेत्यांना 12 तासांच्या आत अटक करण्यात आली. 

* NDTV च्या डजनभर पत्रकारांना निदान स्वत:चे मत इतर  (Facebook, Twitter) माध्यमांद्वारे मांडता तरी येत आहे. इंदिरा गांधीच्या काळात 250 पेक्षा जास्त हिंदी व इंग्रजी भाषेच्या (राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या) पत्रकारांना 48 तासांच्या आत तडकाफडकी मिळेल त्या ठिकाणाहुन उचलुन तुरुंगात डांबले होते, विदेशात (प्रवासानिमीत्य) गेलेल्या 30 पत्रकारांना भारतात प्रवेश नाकारला होता, 1000-1500 संख्येनं दिल्लीत निघालेल्या पत्रकारांच्या निषेध मोर्चा वर लाठी प्रसाद अन तुरुंगात असणाऱ्यांना फ्रिस्टाईल बॉडीमसाज, सरकार विरुद्ध आंदोलन, मोर्चा, उपोषण करणाऱ्या प्रत्येकाला सदंड कारावास आणि हे सर्व भयाण वास्तव वृतपत्रात छापले जाउ नये म्हणुन त्या 48 तास संपुर्ण भारतभरात वीजकपात केली होती.

* NDTV च्या बंदीचा विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्ति, संघटणा, वृत्तवाहिणी तथा वृत्तपत्र यावर सरकारने अधिकृतरित्या कसलीही कारवाई केलेली नाही. आणीबाणी असताना जनतेला तत्कालिन सरकार विरोधात आवाज उचलण्याचीही मुभा नव्हती. (त्यात आणीबाणीच्या विरोधात संपादकीय लिहुन जनतेच्या “अभिव्यक्ति स्वातंत्र्या”बद्दल सरकारला प्रश्न विचारणे ही विचार करण्या पलिकडची बाब होती.)

* सध्यातरी मोदी सरकारने (24तासांसाठीच) NDTV व्यतिरिक्त इतर कुठल्याही चॅनल, वृत्तपत्र, रेडियो, इंटरनेटवर बंदी घातलेली नाही. आणीबाणीच्या काळात  फक्त प्रसारमाध्यमं नव्हे तर टिव्ही चॅनल्स आणि मनोरंजनांच्या माध्यमांवरसुद्धा सरकारने नियंत्रण मिळविले होते. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे “आंधी” व “किस्सा कुर्सीका” ह्या दोन (राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या) चित्रपटांच्या प्रदर्शनावर घातलेली बंदी.

* NDTV ही काही एकमेव वाहिणी नाही की ज्याच्यावर बंदी घातली आहे ! AXN, Fashion TV, सारख्या चॅनल्सनी अश्लिल कार्यक्रम दाखविले होते, ह्या चॅनल्सवर मागिल सरकारने महिनाभर बंदी घातली होती. आणि जेथे राष्ट्रिय सुरक्षेचा प्रश्न असेल तेथे सरकारने असहिष्णू  वातावरणाची भीती बाळगुन मुगभजे गिळून गपगार बसणं योग्य ठरेल का? म्हणजे NDTV च्या (पाकिस्तान धार्जिण्या) पत्रकारांनी भारतीय सेनेचे कमजोर दूवे शोधून दाखवायचे, आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचा मागिल(पठाणकोटचा) हमला अयशस्वी होण्याची कारणे सांगुन पुढल्यावेळेस हमला (घुसखोरी) करण्यासाठी कोणता पर्याय सोपा ठरेल हे नकाशाचे वर्णन करुन दाखविणे. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेचा नाहिए का? 

* आणि सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे   NDTV ह्या खाजगी वृत्तवाहिणीवर ह्या (तथाकथित) अघोषित आणीबाणी  अर्थात बंदीचा कालवधी 24 तासांचा होता,आणि इंदिरा गांधींनी चालविलेली आणीबाणी ही संपूर्ण देशावर दोन वर्षांपर्यंत (21महिने)  विनाकारण लादली होती, ज्यामध्ये विरोध करणाऱ्या प्रत्येक व्यक्ति/संघटणाला तुरुंगात डांबणे, बंदी घालणे, हे प्रकार चालले होते. काही ठिकाणी तर जबरदस्ती नसबंदी करण्याचे प्रकार झालेले आहेत. (मोदींनी हा प्रयोग जे.एन.यू. मध्ये राबवायला काहीही हरकत नाही). प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला तुरुंगात डांबणे, छापाईखाण्याला टाळं ठोकणे, आणि जनतेचे सर्व सामाजिक अधिकार काढून त्यांनाही तुरुंगात टाकणे. असे प्रकार माझ्या ह्या भारत देशात 21 महिन्यापर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाला आणीबाणीच्या दाहकतेची खबर न लागु देता राजरोसपणे सुरु होते.

NDTV सारख्या वृत्तवाहिण्या (आणि फक्त मोदीविरोधाचा विडा उचललेल्या समवैचारिक वृत्तपत्र/संघटणा त्यांचं समर्थन करणारे विचारसरणीचे गुलाम) ह्या प्रकरणात स्वत:चं आत्मपरिक्षण करण्याच्या मन:स्थितीतच नाहीए, एव्हाना ह्या मुद्यांचं भांडवलं करुन राजकीय अनागोंदी कशी करता येईल? हे सरकार कसे पाडता येईल? हाच अजेंडा स्पष्ट होतोय. “अभिव्यक्ति स्वातंत्र्य हा आमचा संविधानिक हक्क आहे.” असं म्हणत जमेल तिथे गळा काढणारे पत्रकारबंधू स्वत:चे देशाप्रती आणि समाजाप्रती असलेले “कर्तव्य” , जगातिल सर्वात मोठ्या लोकशाहीचे “संविधान” नव्याने जाणुन घेण्याचा आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्याबद्दल विचार करण्याचे थोडेसे कष्ट  घेतील अशी सहिष्णू ईच्छा मी व्यक्त करतो.

माहिती संकलन आणि लेखन : 

© सत्यम अवधूतवार

Twitter : @AvdhutwarSatyam

WordPress : @IntolerantSaffron.

लालक्रांती : रक्तरंजीत वाटेवर धावणारे मृगजळ

ह्या साम्यवादाच्या  क्रांतीला मृगजळ म्हणुन संबोधने कितपत योग्य ठरेल हे सांगने कठिण आहे. परंतु तूर्तास तरी ही उपमा देता येईल, कारण लालक्रांती / लालसलाम हे नाव ऐकताच कितीतरी चेहरे, संघटना, राजकीय पक्ष हे गारा पडल्यासारखे डोक्यात गर्दी करतात.

भारतातील माओवादी, नक्सली, साम्यवादी, फूटीरतावादी मंडळी कोणत्या पत्यावर लालसूर्याचा लालप्रकाश शोधत हिंडत आहेत हा एक सामाजिक संशोधनाचा विषय आहे !  लालक्रांती साठी समाजातील नक्की कोणती आदर्श परिस्थिती ह्या लोकांना अपेक्षित आहे ?  ही संकल्पना समाजापुढे स्पष्ट व्हायला हवी. धर्माला अफूची गोळी म्हणुन संबोधणाऱ्या मार्क्सच्या (भारतातील) अनुयायांनी, काश्मिरला भारतासहित “दार-उल-ईस्लाम” बनविण्याची शपथ घेतलेल्या फुटिरतावाद्यांच, पाकपुरस्कृत दहशतवादाचं छूपं समर्थन करुन, जगापुढे काश्मिरी जनतेच्या मानवअधिकाराच्या आणि धर्मविरहीत लोकशाहीच्या गप्पा कराव्यात !  हा परालौकिक विरोधाभास पाहुन तो कार्लमार्क्स ढगातल्या ढगातच बेरंगी अश्रू गाळीत असावा. 
अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी मजुर/कामगारांना ठेउन एक आदर्श आर्थिक प्रारुप ठेवण्याचा प्रयत्न कार्लमार्क्सने केला. खिळखिळी झालेली नेतृत्वहीन राजसत्ता व पोपच्या धर्मव्यवस्थे विरोधात स्वत:च्या हक्कासाठी उभी राहिलेली जनतेची चळवळ, मार्क्सच्या सामाजिक परिवर्तनाच्या साम्यवादी  विचारसरणीला जन्म देऊन गेली. एव्हाना समाजविकासासाठी, मानवांच्या मूलभूत हक्कांसाठी, सामाजिक समतेसाठी लढणारी मार्क्सची विचारसरणी विशुद्ध स्वरुपात न राहता “राजकीय स्वरुपातील हुकुमशाही पुतळ्याच्या साच्याचा आकार घेत होती”. स्टॅलिन, लेनिन, माओ, फिडेल कॅस्ट्रो यांनी मार्क्सच्या मूळ विचारसरणीला फाटा देऊन स्वत:ची राजकीय ईच्छापुर्ती करण्यासाठी त्या विचारसरणीला हुकुमशाहीच्या अन् घराणेशाहीच्या साच्यात व्यवस्थितपणे उतरवलं आणि त्याला मार्क्सचा मुखवटा बसवुन (वंशपरंपरागत) राजसत्ता उपभोगण्यासाठीचा “रक्तरंजित लालरस्ता”  यांत्रिकपणे बनत गेला. कारण बाह्यदर्शनी ही चळवळ कार्ल मार्क्सचीच आहे,  असे दाखविण्यात येत असले तरीही ह्या चळवळीला सुत्रधार वेगळेच होते. 

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात पाय रोवत असताना (आंबेडकरांच्या चळवळीला स्वत:चा पर्याय दाखविण्यासाठी) काही दशकांपर्यंत कम्यूनिस्ट लोकांनी भारतातील शोषित, मागास असलेला कामगारांचा वर्ग “टार्गेट करण्यासाठी बऱ्याच वर्षांपासुन पासुन प्रयत्न चालविले होते. एवढे वर्ष मेहनत घेउनही कम्यूनिस्टांना अपेक्षित असा कामगार वर्ग भेटत नव्हता. तेंव्हा त्यांना नाईलाजाने का असेना आंबेडकरांच्या चळवळीचा आधार घेणे योग्य वाटले. 

राजसत्ता मिळविण्यासाठी हूकुमशाही स्विकारतील ते आंबेडकर कसले ?? आंबेडकरांच्या शुद्ध लोकशाही विचारांशी तडजोड करणे कम्यूनिस्टांना परवडण्यासारखे नव्हते. ब्रिटीशांच्या पदरी होऊ घातलेल्या तत्कालिन निवडणुकीत कॉमरेड लोकांनी आंबेडकरांच्या विरोधात केलेला अपप्रचार आणि आंबेडकरांनी काठमांडूच्या भाषणात आपल्या राजकीय ईच्छाशक्तीची फाडलेली लख्तरं तसेच वैचारिक विरोधाने, स्वातंत्र्योत्तर काळातील कॉमरेड जनतेला कळून चुकले की, हूकुमशाहीची धोरणं आता गुंडाळून ठेवावी लागणार आणि त्यांनी लगेच (हूकुमशाहीच्या साच्यातील ) तथाकथित लोकशाहीवाल्या चळवळीला मार्क्सचा मुखवटा काढून लगेच आंबेडकरांचा मुखवटा चढवला.  तडजोडीनं दलित  आणि आदिवासी समाजाला सुरुवातीला धर्मसत्तेविरुद्ध आणि हळूहळू राजसत्ते विरुद्ध ढकलण्याचे काम सुरु झाले.

 70,80 च्या दशकात उदयास आलेल्या औद्योगिक क्रांतीने भारतात कामगारांचा एक (बहुप्रतिक्षीत आणि अपेक्षित असलेला बहुसंख्यांक वर्ग हळुहळु तयार होत गेला.  कम्यूनिस्टांनी कामगार वर्गातील दलित समाजाला टार्गेट करण्याकडे आपला मोर्चा वळवला खरा पण दूर्दैवाने (आपल्या सुदैवाने) त्यांना कामगारवर्गाला आणि दलितांना साम्यवादी विचारसरणीशी पूर्णत: जोडता आले नाही, अर्थात ते अयशस्वी झाले असेही म्हणता येणार नाही. आंबेडकरांचे गुणगाण गाउन त्यांच्या अनुयायांना हळुहळु टप्याटप्याने साम्यवादी  बनवले आणि त्यानंतर लोकशाहीच्या विरोधाकडे झुकवायला सुरु केले.  80च्या दशकात गिरणी कामगारांच्या समस्या म्हणजे (हूकुमशाही) राजसत्तेकडे कूच करण्यासाठी जणु गवसलेला एखादा राजमार्गच वाटत होता. भांडवलशाही हळुहळु कामगारांची आर्थिक पिळवणूक करीत होती तर कम्यूनिस्ट लोक त्याचा पुरेपुर फायदा उचलत होते. ह्यावेळेसही त्यांना अपेक्षित  यश मिळालं नाही. भांडवलशाहीने गिरणी कामगारांची चळवळ चिरडुन टाकली, आणि कम्यूनिस्टांच्या लेखी गिरणी कामगारांच्या चळवळीचे (राजकीय) महत्व कमी झाले आणि त्यांच्या समस्याही.

एव्हाना कम्यूनिस्ट धार्जिण्या रशियन एजंटांनी वैचारिक बुद्धिभेदाला सुरुवात केली होती . K.G.B. ह्या निमशासकिय रशियन गुप्तहेर कंपनीचा “युरी बेझमेनोव्ह” (Yuri Bezmenov) हा पहिला रशियन एजंट 1963 साली भारतामध्ये आला. तो एजंट म्हणुन नव्हे तर वृत्तपत्राचा संपादक म्हणुन आला आणि त्याने वृत्तपत्राद्वारे धर्मनिरपेक्षतेच्या आड हिंदूत्वावर आणि भारतीय संस्कृतीवर आघात केले, धार्मिक व्यक्तिमत्वांवर प्रश्नचिन्ह उचलले, धर्मग्रंथ काल्पनिक आहेत की नाही अश्या विषयांवर उलटसुलट चर्चा सुरु केली,  शैक्षणिक अभ्यासक्रमात मुघलांचे उदात्तीकरण केले, हळूहळू धार्मिकविरोधाकडून तो भारतीय संस्कृतीच्या विरोधाकडे वळत होता. योग, आयुर्वेद, भारतीय विचारमूल्य, शास्त्रे, जीवनपद्धती ह्याचा जसाजसा तो सखोल अभ्यास करत गेला तसा तो भारतदेशाच्या प्रेमात पडत गेला, आणि शेवटी त्याला स्वत:च्या चूकिची जाणिव झाली, की त्याने ह्या देशातल्या दोन पिढींचे शैक्षणिक पद्धतीद्वारे ब्रेनवॉशच केले होते. त्याच्या एका मुलाखतीमध्ये त्याने How to brainwash a nation हा विषय सांगितला होता, रक्ताचा एकही थेंब ही न सांडता शत्रुराष्ट्राला वैचारिक बुद्धिभेद करुन नामोहरम कसे करावे, त्यावरुनच कम्यूनिस्टांच्या राष्ट्रविरोधी अजेंड्याची कल्पना येते. विवीध प्रकारचे समवैचारिक N.G.O., संघटणा ह्या मानवतावादी, लोकशाही विचारांचा मुखवटा घालुन महाविद्यालय, विद्यापीठ परिसरात कार्यरत असतात, विद्यार्थ्यांमधील व्यवस्थेविरोधात चिड ओळखुन त्यांना विद्रोहाकडे झुकवतात, आणि विद्रोह हा टोकाला गेला की तो हिसंक रूप घेत असतो, ह्याचेच उदाहरण म्हणजेच नक्षलवाद.  ज्याला सशस्त्र विद्रोह म्हणता येईल. ह्या परिस्थितीचे बळी पडलेल्यांची अनेक उदाहरणं देता येतील. 
जून 2016 च्या “लोकमुद्रा” नावाच्या मासिकात कबिर कला मंच च्या ‘सचिन माळी ने आर्थर रोडच्या तुरुंगात असताना “जातिअंतक सांस्कृतिक क्रांतीचे आत्मभान” हे पुस्तक लिहीले होते. ह्या पुस्तकाविषयी माहितीपर लेख ह्या मासिकात छापला होता. नक्षलवादाचा आरोप असलेल्या सचिनला हे देखिल माहित नव्हते की त्याचे गांभिर्य काय आहे ? त्याला झालेला पश्चाताप आणि लालपहाट चा भ्रमनिरास त्याने पुस्तकात लिहून काढलाय. आंबेडकरी चळवळीतील एक सामान्य तरुण विद्रोह करता करता नक्षलवादाकडे कसा झुकला हे विचार करण्यासारखे अन त्यातुन बोध घेण्यासारखे आहे.

रक्तरंजित वाटेवर धावणारे हे लालक्रांतीचे मृगजळ सचिन सारख्या अजुन किती तरुणांचे आयुष्य बरबाद करणार  आहे ???

माहिती संकलन आणि लेखन :

© सत्यम अवधूतवार. 

Twitter : @Chitrakarmee

WordPress : @IntolerantSaffron